बेळगावात गेल्या 6 वर्षात 71 डीएड महाविद्यालये बंद

मिलिंद देसाई
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

बेळगाव : शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकरच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील 71 डीएड महाविद्यालये गेल्या 6 वर्षात बंद झाली आहेत, तर उर्वरीत 13 डीएड महाविद्यालयांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधावे लागत आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 84 डीएड महाविद्यालये होती व विद्यार्थीही मोठ्या संख्येने होते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी सरकारने 9500 शिक्षकांच्या जागा भरती केल्या होत्या. तरीही राज्यात 14000 हुन अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तरीही कायमस्वरूपी जागा भरती करण्याऐवजी अतिथि शिक्षकांची नेमणुक करुण शिक्षण खाते वेळ मारून नेत आहे. 2012 - 13 सालच्या शैक्षणिक वर्षांपासून चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांमधील 40 तर बेळगाव शैक्षणिक जिल्हामधील 22 डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत सध्या डीएड महाविद्यालयांमधील सरकारी कोट्यातील जागाही भरल्या जात नाहीत असे दिसून येत आहे. यावेळीही डीएड महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वाढले नाहीत तर सर्वच महाविद्यालयांवरही परिणाम होणार नाही.

Web Title: 71 D.ed colleges close down in belgaon in 6 years