धक्कादायक ! ७५ वर्षीय महिलेवर अत्याचार; ६६ वर्षाच्या बुजूर्गासह तिघांना अटक

75 Year Old Woman Raped Brutally Assaulted In Kerala 3 Arrested
75 Year Old Woman Raped Brutally Assaulted In Kerala 3 Arrested

एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ६६ वर्षाच्या बुजूर्गासह तिघांना अटक केली आहे. त्या महिलेवर अत्याचार करण्यासोबतच तिला मारहाणही करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६६ वर्षाच्या बुजूर्गासह तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या एका रुग्णालयात त्या महिलेवर उपचार चालू आहेत. त्या महिलेची परिस्थिती गंभीर असली तरी आता मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पिडित महिलेवर सोमवारी सर्जरी करण्यात आली होती. वैद्यकिय अहवालाच्या माहितीनुसार, त्या महिलेच्या खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या आहेत. तसेच, त्या महिलेच्या छातीवर आणि पोटावरही मोठ्या प्रमाणात वार केलेले असल्याने जखमा आहेत.

देशात दोन दिवसांत १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण; आकडा १९ लाख पार

रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले, त्यामध्ये पिडित महिलेची परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. महिलेची मानसिक स्थिती बिघडली होती. परंतु त्यातही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तपास पोलिस करत असून अटक केलेल्या तीनही आरोपींची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com