'अम्मा'च्या निधनाच्या धक्‍क्‍याने 77 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

चेन्नई : अभिनय आणि राजकारण क्षेत्रात अभूतपूर्व लोकप्रियता मिळविणाऱ्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या वृत्तानंतर तब्बल 77 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती एआयडीएमके पक्षाने दिली आहे.

जयललितांच्या निधनानंतर धक्का बसल्याने तब्बल 77 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एआयडीएमके पक्षाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील तळागाळातील सामान्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवून जयललिता यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यामुळेच सोमवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चेन्नईतील रुग्णालयाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि तमिळनाडूसह देशभर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

Web Title: 77 people died of grief, shock over illness and demise