देशात पावसाचे 774 बळी 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

देशात अनेक राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळपाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्रालयाच्या मते, सात राज्यात पाऊस, पुराचे आतापर्यंत 774 बळी गेले आहेत. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, आसाम, नागालॅंड आणि अरुणाचल प्रदेशसहित 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळपाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्रालयाच्या मते, सात राज्यात पाऊस, पुराचे आतापर्यंत 774 बळी गेले आहेत. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, आसाम, नागालॅंड आणि अरुणाचल प्रदेशसहित 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

राज्यनिहाय मृतांची संख्या 
केरळ: 187 
उत्तर प्रदेश: 171 
पश्‍चिम बंगाल: 170 
महाराष्ट्र 139 
गुजरात: 52 
आसाम: 45 
नागालॅंड 8 

केरळचे 8316 कोटी रुपयांचे नुकसान 
केरळमध्ये 22, तर पश्‍चिम बंगालमध्ये 5 जण बेपत्ता 
हिमाचलमध्ये सिमला, मंडी येथे शाळांना सुटी 
उत्तराखंडमध्ये हरिद्वार, पिथोरागड, रुरकी, नैनितालला जोरदार पाऊस 
डेहराडून येथे 12 वीपर्यंतच्या शाळांना सुटी 
बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद 
पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 774 dead due to rain in the country