केरळात बचावकार्य युद्धपातळीवर; पावसामुळे 79 जणांचे बळी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाकडे पुढील बचावकार्याची चौकशी केली. तसेच त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांच्याशीही चर्चा केली.

कोची : मागील आठवडाभर चालू असलेल्या मुसळधार पावसाने केरळ राज्यातील जनजीवन विस्कळीत केले आहे. या पावसामुळे राज्यातील मृतांचा आकडा हा 79 वर गेला आहे. धरणं, नद्या, नाले भरून वाहत आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, तर काही नागरिक बेघर झाले आहेत. कोचीतील विमानतळ बंद ठेवण्यात आले असून, रेल्वे व मेट्रो सेवाही काही काळसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने लष्कर, नौदल, एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर काम करत आहेत. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारकारसह लष्कराचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. वायनाड, इडुक्की, थालापुझा, एर्नाकुलम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाकडे पुढील बचावकार्याची चौकशी केली. तसेच त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांच्याशीही चर्चा केली. 

 

Web Title: 79 died in kerala due to heavy rain rescue operation still going on