esakal | भारत-चीन सीमेजवळ हिमस्खलन; आठ जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Uttarakhand

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत-चीन सीमेजवळ हिमस्खलन; आठ जणांचा मृत्यू
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून भारतीय लष्कराने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. आतापर्यंत ३८४ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात लष्कराला यश आलं आहे. या सर्वांना लष्कराच्या कँपमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामधील सहा ते 10 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लष्काराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवरून अलर्ट जारी केला होता.

शुक्रवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्ठी झाली होती. जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात भारत-चीन सीमेजवळही तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रावत यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्यात.

चमोली जिल्ह्यात याआधीही असाच प्रकार घडला होता. फेब्रुवारीमध्ये चमोलीतील तपोवनमध्ये ग्लॅशियर तुटून ऋषिगंगा नदीत पडला होता. या दुर्घटनेत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.