नैनितालमध्ये ऐंशी वर्षांच्या वृद्धेवर युवकाचा बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नैनिताल- ऐंशी वर्षांच्या वृद्ध महिलेवर एका पंचवीस वर्षीय युवकाने बलात्कार केल्याची घटना घडली असून, त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरामध्ये एकटी असताना त्याच भागात राहणाऱया युवकाने घरात प्रवेश करून वृद्धेवर बलात्कार केला. वृद्ध महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी रात असलेला नातू पळत आला. याबाबतची माहिती त्याने पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक यशवंतसिंग चौव्हाण यांनी सांगितले की, 'आरोपीला अटक करण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, अहवालामध्ये बलात्कार झाल्याचे म्हटले आहे.'

दरम्यान, या घटनेनंतर शेजारी राहणाऱयांना नागरिकांना धक्का बसला आहे. बलात्कार करणारा युवक हा रोजंदारीचे काम करत असल्याची माहिती शेजारच्यांनी दिली.

Web Title: 80-year-old raped in Nainital; 25-year-old held