विमानतळावर बॉडी स्कॅनर बसविणार

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

अमेरिकेप्रमाणेच भारतातील विमानतळावर बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. या पद्धतीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेलच; त्याचबरोबर तपासणीत अधिक निर्दोषपणा येणार आहे. 
 

नवी दिल्ली : अमेरिकेप्रमाणेच भारतातील विमानतळावर बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. या पद्धतीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेलच; त्याचबरोबर तपासणीत अधिक निर्दोषपणा येणार आहे. 

देशभरातील 84 विमानतळांवर मार्च 2020 पर्यंत बॉडी स्कॅनर बसविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. सध्या विमानतळावर धातूच्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी मेटल डिटेक्‍टर आणि दरवाजाप्रमाणे असणाऱ्या स्कॅनरचा उपयोग केला जातो. मात्र, आता या ठिकाणी बॉडी स्कॅनर बसविण्यात येणार आहेत.

सध्याच्या तपासणीच्या पद्धतीतून बिगर धातू शस्त्राचा आणि स्फोटक द्रव्याचा शोध घेता येत नाही. मात्र, बॉडी स्कॅनरच्या मदतीने शरीरात लपविलेले धातू आणि बिगर धातू वस्तू सहजपणे पकडता येतात. देशात 105 सक्रिय विमानतळांपैकी 28 विमानतळ अत्यंत संवेदनशील मानले गेले आहेत. त्यात दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई यासारखे मोठे शहर आणि जम्मू-काश्‍मीर तसेच ईशान्य भारतातील विमानतळांचा समावेश आहे. तसेच, 56 विमानतळांना संवेदनशील श्रेणीत सामील केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 84 airports to install body scanners by March 2020