झेलम एक्‍सप्रेसला अपघात; नऊ डबे घसरले

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

लुधियाना - जम्मूहून निघालेल्या झेलम एक्‍सप्रेसचे पंजाबमधील लुधियानाजवळ फिलोर येथे नऊ डबे रूळावरून घसरल्याने अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

लुधियाना - जम्मूहून निघालेल्या झेलम एक्‍सप्रेसचे पंजाबमधील लुधियानाजवळ फिलोर येथे नऊ डबे रूळावरून घसरल्याने अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

झेलम एक्‍सप्रेस जम्मुहून पुण्याच्या दिशेने येत होते. लुधियानाजवळ फिलोर येथे आज (मंगळवार) पहाटे रेल्वेचे नऊ डबे घसरले. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना लुधियातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतलज ब्रीजजवळ आल्यानंतर रेल्वेचे B5, S1, PC, S2, S3, S4, S5, S6, S7 and S8 ही दहा डबे रूळावरून घसरल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृृत्तात म्हटले आहे.

Web Title: 9 bogies of Jhelum Express derail near Ludhiana