उत्तर प्रदेशात मिनी ट्रकने 9 जणांना चिरडले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

लखनौः बरेली जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी मिनी ट्रकने 30 यात्रेकरूंना धडक दिली असून, यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला आहे.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सीमेजवळ आज सकाळी मा पूर्णिगिरी मंदिराचे 250 यात्रेकरून रस्त्याच्या कडने पायी चालत निघाले होते. वेगात आलेल्या मिनी ट्रकने विक्रीकर कार्यालयाजवळ 30 जणांना उडविले. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी लष्कराच्या जवानांनी मदत केली.

अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, पुढील तपास करत आहेत.

Web Title: 9 Pilgrims Killed After Mini-Truck Rams Group In Uttar Pradesh