मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये ०९ दहशतवाद्यांचा खात्मा; ०१ जवान शहीद

वृत्तसंस्था
रविवार, 5 एप्रिल 2020

भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ०९ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात यश आले आहे. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर ०२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीनगर : भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ०९ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात यश आले आहे. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर ०२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्करांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतीय लष्करानं काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ०९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे काल ४ दहशवादी मारले गेले. तर इतर ५ दहशतवादी नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये ठार झाले आहेत. केरन सेक्टरमध्ये ठार झालेले दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते अशी माहितीही लष्करांकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने जखमी जवानांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अद्यापही हे ऑपरेशन सुरुच आहे, अशी माहितीही लष्करी सुत्रांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 terrorists killed by Indian Army in last 24 hrs in Kashmir valley