रस्त्यांच्या जाळ्यासाठी 9 हजार झाडे तोडली

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

गुरगावमध्ये रस्त्यांबरोबरच उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यासाठी ही वृक्षतोड झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने विकास आराखडा करताना वृक्षलागवडीचाही मुद्दा समाविष्ट केलेला नाही

गुरगाव - शहरामध्ये रस्त्यांचे मोठे जाळे आणि पायाभूत सुविधांचा विकास होणार असला तरी त्यासाठी तब्बल 9 हजार झाडे तोडली गेली असल्याने पर्यावरणावाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इतक्‍या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने शहर आणि परिसरामधील तापमानात किमान 3 अंशांची वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गुरगावमध्ये रस्त्यांबरोबरच उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यासाठी ही वृक्षतोड झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने विकास आराखडा करताना वृक्षलागवडीचाही मुद्दा समाविष्ट केलेला नाही.
 

Web Title: 9 thousand trees cut for road widening