भगतसिंगांचे 'ते' पिस्तूल सापडले

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

इंदूर- भगतसिंगांनी जे पिस्तुल वापरुन ब्रिटिश अधिकारी जॉन साँडर्सवर गोळी झाडली, ते पिस्तुल इंदूरमधील एका प्रदर्शनात मांडण्यात आले असून, हे पिस्तूल बघण्यासाठी अनेक उत्सुक नागरिकांनी गर्दी केली आहे. स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या भगतसिंगांचे हे पिस्तूल तब्बल 90 वर्षांनंतर जगापुढे आले आहे. 

बीएसएफच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स एँड टॅक्टिक्स (सीएसडब्ल्यूडी) सग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1969 पर्यंत पंजाब पोलिस अकादमीमध्ये ऑक्टोबर हे पिस्तुल होते. तेथून ते इंदूरमध्ये आले.परंतु, हे पिस्तुल कुणाचे, इंदूर येथे ते कसे आले याची काणतीही नोंद नव्हती. सीएसडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पिस्तुलचा अभ्यास केल्यावर ते पिस्तूल भगतसिंगांचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

पिस्तुलावरील रंग काढताना त्यावरिल सिरियल नंबर समोर आला. त्यावरून हे पिस्तुल कुणाचे असावे याचा शोध घेताना, साँडर्स खटल्यातील पिस्तुलशी हा नंबर जुळला. त्यावरून, हे पिस्तुल भगतसिंग यांचे असल्याची माहिती समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

इंग्रजांच्या अमानुष मारहाणीत क्रांतिकारक लाला लजपतराय यांचा 1928मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या तिघांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी जे. पी. साँडर्स याची त्यांनी हत्या केली. याप्रकरणीच पुढे भगतसिंग- राजगुरू- सुखदेव यांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती.

Web Title: 90 years on, they just discovered Bhagat Singh’s gun