जीएसटी परताव्याचे 93 टक्के दावे निकाली

पीटीआय
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सीबीआयसी (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि अबकारी शुल्क मंडळ) आणि राज्यांनी जीएसटी परताव्याचे 93.77 टक्के दावे निकाली काढल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. याअंतर्गत 97,202 कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांपैकी 91,149 कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून 6,053 कोटी रुपयांचे दावे शिल्लक आहेत. 

यामध्ये आयजीएसटीचे 95 टक्के म्हणजेच 50,928 कोटी रुपयांच्या परतावा दाव्यांपैकी 48,455 कोटी रुपयांचे दावे जीएसटी नेटवर्कद्वारे 28 नोव्हेंबरलाच अबकारी शुल्क खात्याकडे पाठविण्यात आले आहेत; तर उर्वरित 2,473 कोटी रुपयांचे परतावे काही त्रुटींमुळे थांबविण्यात आले असून, याबाबत निर्यातदारांना कळविण्यात आले आहे; तर आरएफडी -01ए या "आयटीसी'सह अन्य परताव्याचे 46,274 कोटी रुपयांचे दावे सरकारला प्राप्त झाले होते. त्यातील केवळ 902 कोटी रुपयांचे दावे केंद्राकडे; तर राज्यांकडे 2,678 कोटी रुपयांचे दावे शिलल्क आहेत.

उर्वरित 37,406 कोटी रुपयांच्या दावे निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत; तर 5288 कोटी रुपयांच्या दाव्यांमधील त्रुटींबाबत जीएसटी यंत्रणेतर्फे कळविण्यात आले आहे. 

Web Title: 93 percent of GST returns cases Solved