'यूपी'च्या रिंगणात 95 वर्षांच्या जलदेवी 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

आग्रा- येथील 95 वर्षीय जलदेवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी खेरागड येथून नामांकन अर्ज दाखल केला आहे. 

भ्रष्टाचार संपुष्टात आणायचा आपला निर्धार असल्याचा मनोदय जलदेवी यांनी अर्ज भरताना बोलून दाखवला. जलदेवी यांनी आतापर्यंत अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा अशा विविध निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकांमधील राजकीय प्रचाराची रणधुमाळी अनुभवली. मात्र आता देशात बोकाळत असलेला भ्रष्टाचार संपविण्यासाठी आपल्याला आमदार बनून लोकांचे प्रतिनिधित्व करायचे आहे अशी इच्छा बोलून दाखवत त्यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

खेरागड या माझ्या मतदारसंघातील कारभार सुरळीत चालविणे आणि भ्रष्टाचार संपविणे, हा माझा अजेंडा आहे, असे जलदेवी यांनी सांगितले. त्यांनी कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी न मागता अपक्ष म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
Web Title: 95-year-old Jal Devi is candidate for upcoming UP polls