राजस्थानात 97 वर्षीय महिला बनली सरपंच!

वृत्तसंस्था
Saturday, 18 January 2020

-  97 वर्षीय ज्येष्ठ महिलेला मिळाला सरपंच होण्याचा मान.

जयपूर : राजस्थानमधील काही भागात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामध्ये सिकार जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एका गावातील निकाल स्पष्ट झाला. त्यानंतर 97 वर्षीय ज्येष्ठ महिलेची सरपंच म्हणून निवड झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या टप्प्यात 26,800 वार्डमध्ये 2726 ग्रामपंचायत तर 87 पंचायत समिती आहेत. यामध्ये 93,20,684 मतदार आहेत. पंचायत समितीसाठी 17,242 उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता तर 42,000 उमेदवारांनी पंच पदासाठी अर्ज दाखल केला.

Image result for Rajasthan panchayat election esakal

या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 11000 इव्हीएम मशिन्सचा वापर करण्यात आला. तर मतमोजणीच्या पहिल्या दोन तासात 8.30 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 

दरम्यान, या मतमोजणीला सकाळी सुरवात झाली होती. त्यानंतर उशीरा या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये 97 वर्षीय ज्येष्ठ महिलेला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 97 years old woman elected sarpanch in Sikar district