फक्त 13 हजार कोटींसाठी केली ऐतिहासिक नोटाबंदी

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.30 टक्के नोटा आरबीआयकडे जमा झाल्याचे यातून निष्पण्ण होत आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. आज बुधवारी (ता. 29) आरबीआयचा 2017-2018 चा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर जवळपास दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या नोटांचा आकडा आरबीआयने जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 44 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा परत आल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे. म्हणजे फक्त 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नाहीत. 

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.30 टक्के नोटा आरबीआयकडे जमा झाल्याचे यातून निष्पण्ण होत आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. आज बुधवारी (ता. 29) आरबीआयचा 2017-2018 चा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, देशभरातून जुन्या नोटा बँकेतून बदलून घेण्यात आल्या होत्या.

Web Title: 99% of demonetised currency back with central bank

टॅग्स