
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडिओ तर आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हिडिओमध्ये नवरीने चक्क नवरेदेवाला भर लग्नात चोपले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (a bride beaten to groom video goes viral)
या व्हिडिमध्ये दिसतं की नवरदेव आणि नवरी लग्नमंडपात विधीसाठी बसलेले असतात, अचानक नवरेदव असं काही करतो की नवरीचा पारा चढतो आणि ती भर मंडपात असं नवरेदेवाला चक्क मारायला सुरवात करते. हा व्हिडिओ खुप फनी असून असं काही होऊ शकतं, अशी कोणी कल्पनाही करणार नाही.
व्हिडिओमध्ये नवरेदव नवरीच्या गालावर हात लावतो, हे नवरीला आवडत नाही आणि तिचा राग अनावर होतो. नवरी आधीपासूनच रागात असू शकते किंवा तिची लग्न न करण्याची इच्छा नसू शकते त्यामुळे ती अशी वागली असावी, अशी शंका आहे. पण तीने ज्याप्रमाणे नवरदेवाला चोप दिला तो खरंच अत्यंत अचंबित करणारा आहे.
सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर कमेंट करत आहेत.