फूड पार्सलमध्ये सापडली चक्क सापाची कात|Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral news

फूड पार्सलमध्ये सापडली चक्क सापाची कात

ग्राहकाने मागवलेल्या एका फूड पार्सल मध्ये सापाची कात आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना केरळमधील तिरुअनंतपूरम येथील आहे. या घटनेवरुन अन्न सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. सध्या हा प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजतयं. (a customer discovered snake skin in her food delivery parcel in Thiruvananthapuram)

हेही वाचा: लग्नपत्रिका द्यायला गेली होती; अपहरण करून केला महिनाभर बलात्कार

तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील नेदुमनगड येथील एका महिलेने आणि तिच्या मुलीने चंदमुक्कूच्या शालीमार रेस्टॉरंटमधून दोन पराठे ऑर्डर केले होते.एक पराठा मुलीने खाल्ला मात्र दुसरा पराठा खाण्यास सुरवात केल्यावर पार्सलला गुंडाळून चक्क सापाची कात आढळली.

ही बाब लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण अन्न सुरक्षा विभागाकडे सोपवले. अन्न सुरक्षा विभागाने शालीमार रेस्टॉरंटची पाहणी केली आणि नंतर हे रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: Asani Cyclone : मुसळधार पाऊस, चेन्नई विमानतळावरून मुंबईसह १० विमाने रद्द

रेस्टॉरंटच्या पाहणी दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी यांना बऱ्याच गोष्टी आढळल्या. रेस्टॉरंटमध्ये किळसवाणी अस्वच्छता, स्वयंपाक घरात पुरेसा प्रकाश असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सांगितले.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे

Web Title: A Customer Discovered Snake Skin In Her Food Delivery Parcel In Thiruvananthapuram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top