
अजब जुगाड! जुन्या बाईकपासून युवकाने बनवली चक्क Jet Ski
सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत असतात, कधी मजेदार व्हिडिओ तर कधी अचंबित करणारे व्हिडिओ असतात. सोबतच भारत हा जुगाडू देश असल्याने अनेक जुगाडचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एक अजब व्हिडीओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही.
हेही वाचा: सरकारकडून महिलांना शिलाई मशीन, ग्रामीण भागातील महिला होणार सक्षम
जेटस्की (Jetski) खरेदी करण्यासाठी लाखो रुपये लागतात. मात्र व्हिडीओत एका युवकाने (Jetski) वरुन सैर करायची इच्छा पुर्ण करण्याकरीता चक्क अनोखा जुगाड केलाय. जुन्या बाईकचा वापर करून या युवकाने जेट स्की बनवली आहे. जी खऱ्या जेट स्कीप्रमाणे पाण्यात धावताना दिसत आहे.
हेही वाचा: कडक सॅल्यूट! देशासाठी शहीद झालेल्या पतीचं पत्नीनं स्वप्न केलं पूर्ण
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
Web Title: A Young Man Made Jet Ski From An Old Bike Video Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..