गुगलच्या चुकीमुळेच 'यूआयडीएआय'चा नंबर 'सेव्ह'

वृत्तसंस्था
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

'युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'चा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक 18003001947 कोणतीही अतिरिक्त माहिती न देता अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना गुगलने यावर स्पष्टीकरण देताना त्यांच्या चुकीमुळेच हा नंबर आपोआप सेव्ह झाला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.​

नवी दिल्ली : 'युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'चा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक 18003001947 कोणतीही अतिरिक्त माहिती न देता अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना गुगलने यावर स्पष्टीकरण देताना त्यांच्या चुकीमुळेच हा नंबर आपोआप सेव्ह झाला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

गुगलने आपल्याकडून झालेल्या या चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. शुक्रवारी जेव्हा हा यूआयडीएआय या नावे 18003001947 हा क्रमांक अँड्रॉईड मोबाईल्समध्ये सेव्ह झाला तेव्हा या क्रमांकाशी आपला काहीही संबंध नसल्याचे यूआयडीएआय ने ट्विट करत स्पष्ट केले होते. तसेच मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाईड करण्याऱ्या कंपन्यांनीही यासंदर्भात हात वर केले होते. मग हा क्रमांक मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह कसा झाला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

यावर गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, आमच्याकडून जी चूक झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आमच्यामुळे मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे असेही गुगलने म्हटले आहे. अँड्रॉईड डिव्हाइसमध्ये अनधिकृत प्रवेशाचे हे प्रकरण नाही. तुम्ही हा आपोआप सेव्ह झालेला क्रमांक डिलिट करू शकता असेही गुगलने स्पष्ट केले आहे.

Web Title: Aadhaar Authority UIDAI mistake google