मोफत एलपीजी जोडणीसाठी आधारकार्ड बंधनकारक

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

नवी दिल्ली: पंतप्रधान उज्ज्वल योजनेअंतर्गत गरीब महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) जोडणी मोफत मिळविण्यासाठी केंद्र सरकारने आधारकार्ड बंधनकारक केले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान उज्ज्वल योजनेअंतर्गत गरीब महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) जोडणी मोफत मिळविण्यासाठी केंद्र सरकारने आधारकार्ड बंधनकारक केले आहे.

गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात एलपीजी अंशदानासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना एलपीजी जोडणी मोफत मिळविण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वल योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली आहे. या योजनेतून 5 कोटी गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. एलपीजी जोडणी मोफत हवी असल्यास आधारकार्ड नसलेल्या दारिद्य्ररेषेखालील महिलांनी 31 मेपर्यंत आधारकार्डसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी केल्यानंतर त्यांना मोफत एलपीजी जोडणीसाठी अर्ज करता येईल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

सध्या सरकार वर्षाला प्रत्येकी 14.2 किलोच्या 12 गॅस सिलिंडरवर अंशदान देते. बाजारभावाने गॅस सिलिंडरची खरेदी केल्यानंतर अंशदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात सरकारकडून जमा करण्यात येते. आधारकार्डमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याची गरज राहत नाही. त्यांना केवळ आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून देता येते, असे पेट्रोलियम मंत्रालयाने नमूद केले आहे.

Web Title: Aadhar card mandatory for Free LPG Connection