Budget 2019 : NRI नागरिकांना 180 दिवसांत 'आधार'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

- एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच मिळणार आधारकार्ड.

- 180 दिवसांत मिळणार आधारकार्ड. 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये अनिवासी भारतीयांसदर्भात (एनआरआय) निर्णय घेण्यात आला असून, त्यांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेती, रस्ते विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये आधारकार्डबाबत निर्णय घेण्यात आला. ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधारकार्ड दिले जाईल. एनआरआय नागरिकांना 180 दिवसांत आधारकार्ड मिळणार आहे. 

सीतारामन यांनी सांगितले, की भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवसांची वाट न बघता आधारकार्ड सहज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे याचा फायदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar Card will get in 180 Days for NRI