दिल्लीत झाला विजय; आता 'आप'चा डोळा...

वृत्तसंस्था
Saturday, 15 February 2020

पहिल्या टप्प्यात पंजाब लक्ष्य

- मिस कॉल द्या अन्...

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दमदार विजयानंतर आम आदमी पक्षात एकप्रकारे नवी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आप राजधानी दिल्लीच्या बाहेरही विस्तारणार असल्याचे सांगितले जात आहे. आम आदमी पक्ष देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा स्वरूपाचे वक्तव्य आपचे वरिष्ठ नेते गोपाल राय यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोपाल राय म्हणाले, आम आदमी पक्षाने सकारात्मक राष्ट्रवाद पुढे नेण्याचे ठरवले आहे. त्यानुसारच आता पक्षाचा विस्तार करण्याबाबत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि देशभरात पक्षाचे कॅडर निर्माण करण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यातूनच संघटनेचा विस्तार करण्याची योजना बनविणार असल्याचे राय यांनी म्हटले आहे. 

Image result for arvind kejriwal swear in ceremony

पहिल्या टप्प्यात पंजाब लक्ष्य

आम आदमी पक्ष पहिल्या टप्प्यात पंजाबसह अनेक राज्यातील निवडणुका लढविणार आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये स्थानिक निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.  

Image result for AAp

मिस कॉल द्या अन्...

आम आदमी पक्षाच्या राष्ट्र निर्माण अभियानात सामील व्हायचे असेल तर 9871010101 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि सामील व्हा, असे आवाहनही करण्यात आले आहेत.

...अन् मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्याआधी मी डिटेन्शन सेंटरमध्ये असेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aam Aadami Party will contest local elections across country