AAP : महापौर निवडणुकीत 'आप'ने भाजपला चारली धूळ; 'या' आहे नव्या महापौर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AAP News

AAP : महापौर निवडणुकीत 'आप'ने भाजपला चारली धूळ; 'या' आहे नव्या महापौर

नवी दिल्लीः दिल्ली महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला.

आम आदमी पार्टीकडून शैली ओबेरॉय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून रेखा गुप्ता यांनी उमेदवारी दाखल केलेली. महापौर निवडीत आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांचा विजय झाला.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली. महापौर म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. शैली ओबेरॉय यांनी आपण सभागृह संविधानानुसार चालवू असं आश्वासन दिलं. आपण सर्व सभागृहाची गरिमा राखून काम करु, अशी मला आशा असल्याचं ओबेरॉय म्हणाल्या.

आप उमेदवाराच्या निवडीनंतर आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, आज गुंडागर्दीचा पराभव झाला असून जनतेचा विजय झाला आहे. भाजप लबाडी करुन त्यांचा महापौर बसवणार होता. परंतु तसं झालं नाही. मी शैली ओबेरॉय यांना शुभेच्छा देतो, असं भारद्वाज म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalaap