
दहा वर्षांत दोन राज्यांत सत्ता; वाचा 'आप'चा दिल्ली ते पंजाब प्रवास
नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालात पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्याबरोबर कॉंग्रेसच्या अमरिंदर सिंग यांच्यासोबत अनेक दिग्गजांचा पराभव झाला होऊन आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांचा दणदणीत विजय झाला. विजयानंतर आपने पंजाबमध्ये उत्सव साजरा केला आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पंजाबने अवघ्या दहा वर्षात दोन राज्यांत सत्ता स्थापन केली असून एवढ्या कमी काळात आपने हा प्रवास कसा पार केला? त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? त्यांच्या प्रवासातील चढउतार आणि दिल्लीपासून पंजाबपर्यंतचा प्रवास यासंदर्भात आपण माहीती पाहूया.
जनलोकपाल विधेयक तयार करण्याच्या मागणीसाठी ५ एप्रिल २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी एक आंदोलन सुरु केले. या आंदेलनाचे प्रमुख अरविंद केजरीवाल होते. ते या आंदोलनाचे नायक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या आंदोलनाला किरण बेदी, कुमार विश्वास, जनरल व्हीके सिंह या दिग्गजांनी पाठिंबा दिला. सरकारने हे विधेयक पास करण्यासाठी समिती बनवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ९ एप्रिल २०११ मध्ये या आंदोलनाची सांगता झाली. सरकारने आश्वासन देऊनही १५ ऑगस्टपर्यंत विधेयक पास केले नाही म्हणून आण्णांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळालं . त्यानंतर सरकारने हे विधेयक संसदेत नेलं. विधेयक संसदेत पास झाल्यानंतर आण्णांनी आंदोलन थांबवलं.
हेही वाचा: ब्रह्मास्त्र मानलं जाणाऱ्या प्रियांका फेल झाल्या का? पटोलेंनी दिलं उत्तर
याच आंदोलनीच्या ठिणगीतून आम आदमी पार्टीचा जन्म झाला. नोव्हेंबर २०१२ मध्ये आम आदमी पक्षाची अधिकृत स्थापना झाली. तेव्हा शांती भूषण, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास हे केजरीवाल यांचे साथीदार होते. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीने २०१३ मध्ये पहिली निवडणूक लढवली. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत त्यांनी २८ जागा जिंकल्या. त्यावेळी आप ही दिल्लीतील दुसरी सर्वांत मोठी पार्टी होती. त्यानंतर कॉंग्रेसने आपला पाठिंबा दिला आणि आपने दिल्लीत आपली सत्ता स्थापन केली. पण ४९ दिवसांतच केजरीवाल यांनी आपला राजीनामा दिला होता.
त्यानंतर २०१४ मध्ये आपने ४०० जागांसाठी लोकसभा निवडणूक लढवली मात्र फक्त ४ जागांवर त्यांना विजय मिळाला, त्यानंतर २०१५ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुकांत चांगला विजय मिळाला. त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांत चांगला विजय मिळवता आला नाही.
२०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांत आपला प्रचंड यश मिळाले. एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर आपचा विजय झाला. या पाच वर्षाच्या प्रवासात खूपजणांनी त्यांची साथ सोडली तर काहींना पक्षातून बाहेर काढण्यात आलं. २०१५ मध्ये योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि आनंद कुमार यांना आपमधून काढण्यात आलं. त्यानंतर आपने दिल्लीच्या बाहेरही आपला प्रचार सुरु केला. २०१७ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकांत आपने २० जागांवर विजय मिळवला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत आपला दिल्लीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यावेळी फक्त पंजाबमधून एका जागेवर आपला समाधान मनावं लागलं होतं. सध्याच्या पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी लोकसभेची ती जागा जिंकली होती.
दिल्लीच्या विजयानंतर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरु झाला. त्यानंतर आता आम आदमी पार्टीने उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, गोवा या राज्यांतील निवडणुक लढवली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. पंजाबमध्ये आप पहिल्यांदाच सत्तेवर आलेले आपल्याला पहायला मिळत आहे. २०१५ मध्ये ७० जागामधील ६७ जागांवर दणदणीत विजय मिळवून आपली सत्ता राखली होती. या काळात त्यांना बऱ्याच कार्यकर्त्यांनी साथ दिली तर अनेक लोक सोडून गेले. २०१४ मध्ये पक्षाच्या राजनीतीवर प्रभावित होऊन पत्रकार आशुतोष आपमध्ये सामील झाले होते. ते २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक लढले पण त्यांचा पराभव झाला.
हेही वाचा: Punjab: भगतसिंगांच्या गावी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; आपची घोषणा
त्यानंतर त्यांनी पार्टी सोडली. आपच्या सह-संस्थापकांपैकी एक असलेल्या शाझिया इल्मीने 2014 मध्ये पक्ष सोडला आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या त्या भाजपाच्या प्रवक्त्या आहेत. त्यानंतर कुमार विश्वास सुद्धा वैयक्तिक मतभेदांमुळे पार्टी सोडून गेले. तसेच संस्थपकांमधील योगेंद्र यादव यांची पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी करण्यात आली. नंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रामाणिकता, पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने 'स्वराज इंडिया' या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. सुप्रीम कोर्टाचे वकील २०१२ मध्ये पार्टी भ्रष्टाचारमुक्त होईल या आशेने आपमध्ये सामील झाले होते पण योगेंद्र यांच्यासोबतच त्यांनाही पक्षातून काढण्यात आलं होतं. या सगळ्या घडामोडीनंतर सध्या आम आदमी पक्षांकडे दिल्ली आणि आता पंजाब या दोन राज्यांची सत्ता आहे.
Web Title: Aam Adami Party Journey From Past Ten Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..