हिमाचलमध्ये 'आप'ला भगदाड; महिला मोर्चा अध्यक्षांचाही भाजपात प्रवेश

हिमाचलमधील आपच्या महिला मोर्चा अध्यक्ष ममता ठाकूर यांच्यासह काही नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.
mamta thakur join bjp
mamta thakur join bjpSakal

शिमला : देशांतील पाच राज्यांच्या निवडणुकानंतर हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला भगदाड पडलं आहे. एक एक करत हिमाचलमधील नेते आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत असल्याने सध्या पक्षाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. हिमाचलमधील आपच्या महिला मोर्चा अध्यक्ष ममता ठाकूर यांच्यासह काही नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.

दरम्यान पाठीमागे झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये आपने पंजाबमध्ये सत्ता स्थापन करुन देशाचे लक्ष वेधले होते. काही दिवसांपूर्वीच आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन महामंत्री सतीश ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला होता. मंत्री त्यानंतर आपने त्यांच्या महिलांविषयीच्या वागण्यावरुन आणि बोलण्यावरुन त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता अनुराग ठाकूर यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या घरी नेऊन त्यांना पक्षांत सामील करुन घेतलं होतं.

mamta thakur join bjp
उगाचंच भीतीने पोटात गोळा आला होता...; वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष ममता ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केल्याने आपची गळती सुरु झाल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. यानंतर आपचे नेते आणि दिल्लीतील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्वीटर वरुन याची माहिती देवून लवकरच नवीन कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जैन यांच्यावर निशाना साधत केजरीवालांना हिमाचलमध्ये सत्ता स्थापण करणं अवघड झाल्याचं म्हटलंय.

mamta thakur join bjp
अनिल देशमुखांसह चार आरोपींच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ

दरम्यान वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात हिमाचल आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी सगळ्याच पक्षांची पूर्वतयारी सुरु असून मागच्याच आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री माण यांनी हिमाचलमध्ये रॅली काढत आपलं शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर एका आठवड्यातच पक्षांच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडल्याने आपला हिमाचलमध्ये मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com