आमिर खानने तुर्की राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्यानं भारतात राजकीय 'दंगल'

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

एर्दोगन हे एका इस्लामिक राष्ट्राचे प्रमुख असून त्यांनी वारंवार भारत विरोधी वक्तव्यं केली आहेत.

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता आमिर खान (actor aamir khan) सोशल मीडियावर वादाचा मुद्दा ठरला आहे. आमिर खानने तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांच्या पत्नी एमिली एर्दोगन यांची भेट घेतली आहे. आमिरने भारत विरोधी असणाऱ्या एर्दोगन यांची भेट घेतल्याने त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. आमिरने भारत विरोधी असणाऱ्यांशी भेट घेण्याची काय गरज होती, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. 

चीनचा आडमुठेपणा कायम; सैन्य माघारी घेण्यास करतोय टाळाटाळ

एर्दोगन हे एका इस्लामिक राष्ट्राचे प्रमुख असून त्यांनी वारंवार भारत विरोधी वक्तव्यं केली आहेत. काश्मीर मुद्द्यावरुन त्यांनी उघडपणे भारताचा विरोध केला आहे. आमिरने एर्दोगन यांच्या पत्नीची भेट घेतल्याने त्याच्यावर टीका होत आहे. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरु केले आहे. असे असताना आमिरच्या बचावासाठी काही नेते पुढे आले आहेत. 

आमिरने काही वर्षांपूर्वी 'भारतात राहायला आता भीती वाटते', असं म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्याने एमिली एर्दोगन यांची भेट घेतल्याने भाजप, आरएसएस आणि वीएचपीशी संबंधित लोकांनी त्याच्यावर टीका सुरु केली आहे. मात्र, काँग्रेसचे काही नेते आमिरच्या बचावासाठी पुढे आले असून हा वाद विनाकारण सुरु करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

आमिर खान एक स्वतंत्र नागरिक आहेत. ते त्यांच्या मर्जीनुसार कुणाचीही भेट घेऊ शकतात. आमिर देशाचे दूत किंवा संसद सदस्य नाहीत. ते दाऊद इब्राहिमला भेटले असते तर ते चुकीचं झालं असतं. त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत. मात्र, मी तुर्कस्तानचा कायम विरोध करत राहिन, असं काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले आहेत. सिंघवी यांनी सोमवारी टर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट ट्विट केली होती.

काय सांगता! वुहान शहरातील वॉटर पार्कमध्ये हजारो चिनी नागरिकांची पार्टी
 

भाजपने आमिर खान यांच्यावर निशाणा साधला आहे. आमिर खान यांना स्वातंत्र्य असले तरी त्यांचे देशाचा नागरिक म्हणून काही कर्तव्ये आहेत. तुर्कस्तान नेहमी भारताविरोधात बोलत आला आहे. अशा परिस्थितीत ते तुर्कस्तानच्या पहिल्या महिलेची भेट कशी घेऊ शकतात. एर्दोगन यांनी दिल्ली दंगलीबाबत टीका केली होती. आमिर खान भारतीयांच्या प्रेमामुळे आमिर खान बनले आहेत, असं भाजप प्रवक्ता गौरव भाटिया म्हणाले आहेत. आमिर खानच्या वादावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्विट केलं आहे. मी खरा सिद्ध झालो. मी आमिर खानला तीन खानमधील एक मस्केटियर्स म्हणालो होतो, असं ते म्हणाले.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khan meet turkey president Recep Tayyip Erdogan wife