Delhi Election : एका दणक्यात 'आप'चे 70 उमेदवार जाहीर; केजरीवालांचा मतदारसंघ कोणता?

वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आम आदमी पक्षाने आज एकाच फटक्‍यात सर्वच्या सर्व 70 जागांवरील उमेदवारांची घोषणा करून विरोधकांवर आणखी एक आघाडी घेतली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आम आदमी पक्षाने आज एकाच फटक्‍यात सर्वच्या सर्व 70 जागांवरील उमेदवारांची घोषणा करून विरोधकांवर आणखी एक आघाडी घेतली. वर्तमान 46 आमदारांना तिकिटे देताना "आप'ने 15 आमदारांची तिकीटे कापली असून, महिला उमेदवारांची संख्या 6 वरून 8 वर गेली आहे. दिल्लीत येत्या 8 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होऊन 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसरीकडे केजरीवालांच्या आव्हानाला सामोरे जाताना धापा टाकणाऱ्या भाजपला स्थानिक अंतर्कलहामुळे अजूनही पहिली यादी जाहीर करता आलेली नाही. भाजपची पहिली 50 उमेदवारांची यादी संक्रांत संपल्यावर उद्या (ता.15) किंवा त्यानंतरच्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरही भाजपमध्ये वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खाऊनही तिकीट कापले गेलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा असंतोष भाजपला झएलावा लागण्याची चिन्हे आहेत कारण प्रत्येक भाजप खासदार व प्रत्येक नेता स्वतःची प्यादी पुढे सरकवण्यात मग्न दिसत आहे.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

दरम्यान आपने ज्या 15 आमदारांची तिकीटे कापली त्यांनीही नेत्यांच्या घरासमोर निदर्शने, धरणे आदी सुरू केले आहे. मात्र, आपचे नेतृत्व निर्णयावर ठाम राहिल्यास यातील बहुसंख्य आमदारांना भाजप आपल्या झोळीत घेऊन रातोरात पावन करण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. आजच्या यादीपाठोपाठ आपचा निवडणू जाहीरनामाही याच आठवड्यात येणार आहे. भाजप त्यासाठी पुढच्या आठवड्यातील मुहूर्त शोधत आहे. कॉंग्रेस यावेळेसही रिंगणात जवळपास अस्तित्वहीन अवस्थेत दिसत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीचे आन्हीक उद्या होणार आहे. आपच्या यादीत मुख्यमंत्री केजरीवाल (नवी दिल्ली), त्यांचे सिपाह-सालार व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (पटपडगंज) यांच्याशिवाय लोकसभा निवडणुका लढलेले राघव चढ्ढा व आतिशी यांची नावे आहेत. शोएब इकबाल यांच्यासह कॉंग्रेस नेते महाबल मिश्रा यांचे चिरंजीव विनयकुमार मिश्रा (द्वारका), शोएब मुख्तार (मटिया महल) आदी सहा आयारामांना आपने तिकिटे दिली आहेत. 

महाराष्ट्राचे चार वेगळ्या राज्यांत विभाजन करा; कोणी दिल्ला सल्ला?

प्रमुख उमेदवार 
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल 
पटपड़गंड - मनीष सिसोदिया 
टियामहल- शोएब इकबाल 
तिमारपुर - दिलीप पांडे 
नरेला - शरद चौहान 
बुराड़ी- संजीव झा 
चांदनी चौक - प्रह्लाद साहनी 
वजीरपुर - राजेश गुप्ता 
बाबरपुर - गोपाल राय 
बादली - अजेश यादव 
पालम - भावना गौर 
राजेंद्रनगर - राघव चा 
करोलबाग- विशेष रवि


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP announces list of 70 candidates, CM Arvind Kejriwal to contest from New Delhi seat