
'पीए'ला लाच घेताना रंगेहात पकडले, आमदाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी
पंजाब : दक्षता ब्युरोने आम आदमी पार्टीचे आमदार अमित रतन कोटफट्टा यांना भटिंडा देहाट येथून अटक केली होती. यापूर्वी १६ फेब्रुवारीला त्यांच्या पीएला देखील अटक करण्यात आली होती. दक्षता पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. स्विय सहाय्यक रेशम गर्ग याला चार लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
रेशम गर्ग यांनी गुड्डा गावच्या सरपंचाकडे लाच मागितली होती. हे पैसे बिल पास करण्यास मागितल्याचे सांगितले होते. मात्र अमित रतन कोटफट्टा यांनी रेशम गर्ग त्यांचे स्वीय सहाय्यक नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान आम्हाला आप आमदार अमित रतन यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. रिमांड दरम्यान, आम्ही त्यांचे बँक स्टेटमेंट्स, त्यांच्या घरातून जप्त केलेली कागदपत्रे तपासू, असे पोलिस उपअधीक्षक बलवंत सिंग यांनी सांगितले आहे. पोलिसांनी अमित रतन यांना २३ फेब्रुवारी अटक केली होती.