सुरक्षारक्षकावर हल्ला; 'आप' आमदारला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेच्या (एम्स) सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना आज अटक करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेच्या (एम्स) सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना आज अटक करण्यात आली आहे. 

भारती यांनी "एम्स‘च्या सुरक्षा रक्षकांसोबत गैरवर्तन करत हल्ला केल्याची तक्रार हौझ खास पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. "एम्स‘चे मुख्य सुरक्षा अधिकारी आरएस रावत यांनी त्याबाबत तक्रार केली होती. भारती यांनी 9 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शासकीय (एम्स) मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी जमावाला प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले होते. तसेच भारती यांनी एम्स परिसरातील गौतम नगर नालाह रस्त्यावर अनधिकृत व्यक्तींना जेसीबी आणण्याची परवानगी देऊन सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन करून त्यांच्यावर हल्ला केल्याचेही रावत यांनी तक्रारीत म्हटले होते. आज (गुरूवार) त्यांना अटक करण्यात आले आहे. 

बुधवारीच आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना लैंगिक अत्याचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. याशिवाय "आप‘मधील अन्य काही आमदारांवरही वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: aap mla attacks security personeel

टॅग्स