Delhi Elections:'जनताने बीजेपी को करंट लगाया'; ओखलातील आपच्या विजयी उमेदवाराची टीका

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

भाजपने धर्माच्या मुद्यावर ध्रुवीकरण करत आहेत, असा आरोप होत असतानाच जामिया मिलीया विद्यापीठ ज्या मतदारसंघात आहे, अशा ओखला विधानसभा मतदारसंघात आपचे अमनतुल्लाह खान हे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : आपच्या झाडूने दिल्लीमध्ये सगळ्यांचाच सुफडा साफ केला आहे. दिल्ली विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे. सकाळपासून आलेल्या अंदाजानुसार आप सर्वाधिक म्हणजे ५८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने धर्माच्या मुद्यावर ध्रुवीकरण करत आहेत, असा आरोप होत असतानाच जामिया मिलीया विद्यापीठ ज्या मतदारसंघात आहे, अशा ओखला विधानसभा मतदारसंघात आपचे अमनतुल्लाह खान हे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील निवडणूक ही स्पष्टपणे आप विरुद्ध भाजप अशी झाली. ओखला मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या अमनतुल्लाह खान यांनी जामिया मिलीयामध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली. खान म्हणाले 'दिल्लीच्या जनतेने भाजप व अमित शहांना करंट लावला आहे. हा विकास कामांचा विजय आहे व द्वेषाची हार आहे. जनेतेने मतदान करून रेकॉर्ड तोडलं आहे.' अशी जहरी टीका खान यांनी भाजपवर केली. 

Delhi Elections : काँग्रेस शून्यावरच; दिल्ली प्रदेशाध्यक्ष देणार राजीनामा

जामिया मिलीया विद्यापीठात दिल्ली निवडणूकीपूर्वी अत्यंत असंवेदनशील वातावरण होते. येथील विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात जाऊन मारहाण केली होती.  यानंतर जामिया मिलीया विद्यापीठीत सीएए, एनआरसीविरोधात होणाऱ्या आंदोलकांवर एका माथेफिरूने बंदुक रोखून धरली होती. अशा प्रकारे असंवेदनशील वातावरण असूनही येथील जनेतेने केलेले काम बघितले व आपला निवडून दिले. 

Image result for modi shah sad

आपचा जल्लोष
सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. 

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

भाजप कार्यालयाबाहेर शुकशुकाट
भाजपनं या निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक रणांगणात उतरवली होती. दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडं या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली. स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीत लक्ष घातलं होतं. पण, भाजपला अपेक्षित यश आलं नाही. भाजपनं दिल्लीत सत्तांतर करण्याचा अक्षरशः विडा उचलला होता. शाहीनबाग आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत, अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण, या गळ्या प्रयत्नांनंतरही भाजपला अतिशय माफक यश मिळालं. त्यामुळं भाजपच्या गोटात निराशा दिसत आहे. एरवी कार्यकर्त्यांनी गजबजणारे भाजपचे मुख्यालय आज शांत शांत होते. मुख्यालयात अक्षरशः शुकशुकाट होता. कार्यकर्तेच नव्हे तर, नेतेही या कार्यालयाकडं फिरकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP Okhla candidate Amanatullah Khan criticized Amit Shah in Delhi Elections