प्रादेशिक आराखडा 2021 विरोधात आम आदमी पक्षाचे निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

गोवा : सरकारने राज्यासाठी तयार केलेला प्रादेशिक आराखडा 2021 हा विनाशकारी तसेच गोव्याचे पर्यावरण उद्ध्वस्त करणार असल्याने तो स्थगित ठेवण्याची मागणी करणारे निवेदन आज आम आदमी पक्षातर्फे मुख्य नगर नियोजकांना सादर केले. या आराखडा तयार करण्यापूर्वी गावागावातून आलेल्या हरकती व सूचनांवर निर्णय घ्यावा. या आराखड्यामुळे गोव्यातील जमिनींची किंमत भरमसाठ वाढल्याने गोमंतकियांना स्वतःचे घर घेणेही कठीण बनले आहे.

जोपर्यंत हा आराखड्यात लोकांच्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आम आदमी पक्षाचे ही आंदोलन चळवळ सुरूच राहणार असल्याचे पक्षाचे प्रमुख एल्विस गोम्स यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: aap oppose to pradeshik arakhada 2021