कपिल मिश्रांचे आरोप निराधार; 'आप'चा दावा!

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

केजरीवाल यांना तातडीने अटक करावे
'सुरुवातीला ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते. आता त्यांच्या पक्षांच्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. याची गांभीर्यान दखल घेऊन केजरीवाल यांना तातडीने अटक करायला हवी', अशा प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केल्या आहेत. तर भाजप नेते श्‍याम जाजू म्हणाले, 'सारे काही जाहीर झाल्यानंतर केजरीवाल यांच्याबाबत कोणतीही सहिष्णुता न दाखवता त्यांना सत्तेतून निष्कासित करायला हवे.'

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून आम आदमी पक्षाचे नेते (आप) कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप निराधार आणि हास्यास्पद असल्याचा दावा 'आप' ने केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले, 'आज त्यांनी (कपिल मिश्रा) केलेल्या हास्यास्पद आणि निराधार आरोपांबद्दल बोलण्यासारखे काहीही नाही. अशा आरोपांवर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही आणि अशा गोष्टी उत्तर देण्यायोग्यही नाहीत.'

'आप' नेते सत्येंद्र जैन यांनी 50 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारासाठी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याचे मी स्वत: पाहिले असल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे. 'मी आम आदमी पक्षाचा संस्थापक सदस्य असून पक्ष सोडून कोठेही जाणार नाही. भ्रष्ट नेत्यांना पक्षातून काढून टाका. 2004 मधील आंदोलनापासून मी पक्षाशी जोडला गेलो. मी कोठेही जाणार नाही. येथेच थांबेन आणि स्वच्छता करेन', अशा प्रतिक्रिया मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केल्या.

केजरीवाल यांना तातडीने अटक करावे
'सुरुवातीला ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते. आता त्यांच्या पक्षांच्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. याची गांभीर्यान दखल घेऊन केजरीवाल यांना तातडीने अटक करायला हवी', अशा प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केल्या आहेत. तर भाजप नेते श्‍याम जाजू म्हणाले, 'सारे काही जाहीर झाल्यानंतर केजरीवाल यांच्याबाबत कोणतीही सहिष्णुता न दाखवता त्यांना सत्तेतून निष्कासित करायला हवे.'

Web Title: AAP rejects Kapil Mishra's 'absurd' charges