'AAP चा दणदणीत विजय राष्ट्रीय स्तरावर...', भाजपच्या नेत्याचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AAP Rise Effect on BJP National Politics

'AAP चा दणदणीत विजय राष्ट्रीय स्तरावर...', भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP Punjab Victory) दमदार विजय मिळविला आहे. काँग्रेससारख्या (Congress) प्रस्थापित पक्षाला मागे टाकत मुसंडी मारली आहे. आपने दिल्लीत देखील प्रस्थापित पक्षांना टक्कर दिली होती. त्यामुळे 'आप'चा विजय हा राष्ट्रीय स्तरावर भाजपसाठी (BJP) धोकादायक ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यालाच भाजपच्या एका नेत्यानं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: Punjab: भगतसिंगांच्या गावी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; आपची घोषणा

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election Result) आम आदमी पक्षाच्या दमदार विजयाचा अर्थ म्हणजे राष्ट्रीय स्तरावर भाजपसाठी डोकेदुखी ठरेल असे नाही. आपला भाजपसाठी पर्याय म्हणून उदसाय येण्यासाठी लोकसभेच्या किमान शंबऱ जागा जिंकाव्या लागतील. दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगल जनादेश मिळणे म्हणजे भाजपविरोधी मते अधिक विभागली गेलीत, असंही जेष्ठ भाजप नेते पी. मुरलीधर राव म्हणाले.

काँग्रेस काही वर्षांपूर्वी एक स्थिर राष्ट्रीय पक्ष म्हणून केंद्रस्थानी होता. तसेच येत्या २० वर्षांत भाजप केंद्रस्थानी असेल. भाजपविरोधातील पक्ष कमी होत आहे. विरोधक म्हणून काँग्रेसची क्षमता संशयास्पद आहे. पण, आप काँग्रेसच्या जागेवर असू शकते. पण, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून उदयास येण्यासाठी त्यांना लोकसभेत किमान १०० जागा जिंकता आल्या पाहिजे, असंही राव म्हणाले.

महिला आणि दुर्बल घटकांमध्ये आपचे वजन वाढले, तर आप मजबूत शक्ती बनून उदयास येऊ शकते, हे भाजप नेत्यांनी मान्य केलं आहे. आप कल्याणकारी राजकारणात विश्वास ठेवते. तसेच आप समाजातील दुर्बल घटकांना आकर्षित करते. त्यामुळेच हे मतदार त्यांच्यावर विश्वास दाखवतात. त्यामुळे असेच चालत असेल तर आपल्यासाठी म्हणजेच भाजपासाठी ही नक्कीच वाईट बातमी असेल. पण, काय होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितलं.

आप कल्याणकारी राजकारण करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. पण भाजप त्यात पारंगत आहे. आम्ही लाभार्थी एकत्र केले आहेत आणि त्यांचा पक्षावर विश्वास आहे. त्यामुळे त्यात आप भाजपला धोका देऊ शकत नाही. ममता बॅनर्जी किंवा एमके स्टॅलिन उदयास येऊ शकतात, कारण त्यांच्या राज्यांमध्ये 41 आणि 39 लोकसभेच्या जागा आहेत. पण पंजाब आणि दिल्ली दोन्ही मिळून फक्त २० जागा आहेत. शेवटी हे सर्व अंकगणित आहे. जास्तीत जास्त आप एचडी देवेगौडा किंवा आय के गुजराल होऊ शकते, असे भाजपचे राज्यसभा खासदार अनिल जैन म्हणाले.

Web Title: Aap Rise Will Not Affect Bjp National Politics Says Bjp Leader

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpAap party
go to top