'तुम्ही मिलानहून परत आलात काय ?', नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या राहुल गांधींना सवाल

rahul gandhi main.png
rahul gandhi main.png

नवी दिल्ली- इटलीत गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आम आदमी पक्षाने (आप) निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक टि्वट केले आहे. त्यावर आपने राहुल गांधी यांना 'तुम्ही मिलानवरुन परत आलात काय?' असा खोचक सवाल केला आहे. राहुल गांधी हे नेहमी सुटीसाठी विदेशात जातात. प्रत्येकवेळी विरोधक त्यांच्यावर टीकेची झोड उठवतात. 

यापूर्वी काँग्रेसच्या स्थापना दिनीच विदेश दौऱ्यावर गेल्यामुळे राहुल गांधी हे टीकेचे धनी ठरले होते. त्यावेळी राहुल गांधी हे विदेशातील आपल्या आजारी नातेवाईकाला भेटायला गेले आहेत. यावर भाजपचा आक्षेप नसायला हवा, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले होते. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांच्यासह आणखी काही नेते राहुल गांधी यांच्या समर्थनात उतरले होते. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. 

राहुल गांधी यांनी नव्या वर्षानिमित्त देशाची सुरक्षा करताना जीव गमवावा लागलेल्या शहीदांचे स्मरण केले. आपल्या हक्कासाठी लढत असलेल्या शेतकरी आणि मजूरांबरोबर मी सदैव आहे, असे टि्वट त्यांनी केले. राहुल गांधी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनात त्यांनी अनेकवेळा मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना म्हटले की, नवीन वर्ष सुरु झाले आहे. ज्यांना आपण गमावलो आहोत, अशा व्यक्तींचे मी स्मरण करतो. मी त्यांचे आभार मानतो, जे आपले रक्षण करत आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com