विरोधकांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 'आप'चा पाठिंबा | AAP Support Opposition's candidate Margaret Alva says MP Sanjay Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vice Presidential 2022 Candidate Margaret Alva

विरोधकांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 'आप'चा पाठिंबा

नवी दिल्ली - देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून त्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदावर यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला. आता उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीची चुरस वाढली असून विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: BSP Chief : मायावतींची मोठी घोषणा, निवडणुकीत NDAचे उमेदवार जगदीप धनखर यांना बसपाचा पाठिंबा

मार्गारेट अल्वा यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिंदे गटाने उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या गटाने युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रसेने अल्वा यांना पाठिंबा दिला नाही.

दरम्यान मार्गारेट अल्वा यांना आम आदमी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी आपकडून अल्वा यांना पाठिंबा देण्यात येत असल्याची घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे.

Web Title: Aap Support Oppositions Candidate Margaret Alva Says Mp Sanjay Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top