रघुराम राजन होणार 'आप'चे खासदार?

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

आपने राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना संधी न देता वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राजन हे सध्या शिकागो विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी नोटाबंदीला विरोध केला होता. 

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून (आप) राज्यसभेच्या खासदार पदासाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडून जानेवारी अखेरपर्यंत तीन जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला सतत लक्ष्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजन यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. राजन यांचा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना सतत विरोधी पक्षांकडून सहानुभूती दाखविण्यात येत आहे.

आपने राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना संधी न देता वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राजन हे सध्या शिकागो विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी नोटाबंदीला विरोध केला होता. 

Web Title: AAP Wants Outsiders For Its 3 Rajya Sabha Seats, Raghu Rajan Heads List