पंजाबमध्ये काँग्रेसला आपचा धोका नव्हता : कॅ. अमरिंदर

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाबाबत बोलताना काँग्रेस नेते डॉ. अमरिंदर सिंग यांनी या निवडणुकीत काँग्रेसला आम आदमी पक्षाचा कोणताही धोका नव्हता, असे स्पष्टीकरण लिदे आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाबाबत बोलताना काँग्रेस नेते डॉ. अमरिंदर सिंग यांनी या निवडणुकीत काँग्रेसला आम आदमी पक्षाकडून  कोणताही धोका नव्हता, असे स्पष्टीकरण लिदे आहे.

आज (मंगळवार) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत कॅ. अमरिंदर यांची बैठक झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आमची केवळ दहा मिनिटांची बैठक झाली. काँग्रेसने प्रचंड परिश्रम घेतले. त्याचे परिणाम या निवडणुकीत दिसले. काँग्रेसला आपकडून कोणताही धोका नव्हता. त्यांनी सोशल मिडियावर अत्यंत प्रभावी वापर केला आणि त्याचाच गाजावाजा केला.' सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सोमवारी पंजाबचे राज्यपाल व्ही.पी.सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला.

पंजाबमधील एकूण 117 जागांपैकी काँग्रेसला 77 जागांवर यश मिळाले आहे. आम आदमी पक्षाला 20 जागा तर शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या युतीला केवळ 18 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Web Title: AAP was no threat to Congress in Pubjab : Cap. Amrinder