पोलिसांबरोबरील चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

कजोलगाव (आसाम): येथील चिरांग जिल्ह्यात आज पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन एनडीएफबीचे दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

अमगुरी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या सिमलगुरी येथे ही चकमक झाली. या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, लूकूस नरझरे आणि डेव्हिड इस्लेरी अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही म्यॅनमारमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे बोडोलॅण्ड जिल्हा प्रशासनाचे आयजीपी अनुराग अगरवाल यांनी सांगितले.

Web Title: Aasam: Two terrorists killed in encounter