अब्दुल करीम तेलगी 'व्हेंटिलेटरवर' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

तेलगी बालपणी बेळगावमध्ये रेल्वेस्थानकाच्या बाहेर शेंगा विकत असे. मुद्रांक गैरव्यवहारात कोट्यवधी रुपये मिळविल्यानंतर मुंबईतील लेडीज बारमध्ये एका रात्री कोट्यवधी रुपये उडवल्यामुळे तो सर्वांच्या नजरेत आला होता.

मुंबई : वीस हजार कोटींहून अधिक रकमेच्या मुद्रांक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती खालावल्यामुळे त्याला सोमवारी बंगळूर येथील व्हिक्‍टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला कृत्रिम श्‍वासोच्छवास यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणी तो बंगळूरमधील मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 

तेलगी बालपणी बेळगावमध्ये रेल्वेस्थानकाच्या बाहेर शेंगा विकत असे. मुद्रांक गैरव्यवहारात कोट्यवधी रुपये मिळविल्यानंतर मुंबईतील लेडीज बारमध्ये एका रात्री कोट्यवधी रुपये उडवल्यामुळे तो सर्वांच्या नजरेत आला होता.

या गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील एका पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1998 ते 2003 या काळात देशभरात तेलगीविरोधात 43 गुन्हे दाखल झाले होते. त्याला नोव्हेंबर 2001 मध्ये अटक करण्यात आली होती. एका प्रकरणात त्याला 2007 मध्ये 30 वर्षांच्या तुरुंगवासाची, तसेच 202 कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान भिवंडी येथे तब्बल दोन हजार 200 कोटी व कफ परेड येथे 800 कोटी रुपयांचे मुद्रांक आढळले होते.
 
Web Title: Abdul Karim Telgi hospitalised, critical