अटकेपार झेंडा : विद्या कुलकर्णींनी तमीळनाडूत उंचावली महाराष्ट्राची मान

अभय दिवाणजी
Friday, 28 February 2020

मूळच्या सोलापूर येथील विद्या कुलकर्णी यांनी तामिळनाडूसारख्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच अनेक क्लिास्ट गुन्हे उघडकीस आणले.

गणेश विसर्जनाची मिरवणूक रंगात आली होती... वाद्यांनी जोर धरला तसा कार्यकर्त्यांनी नाचात रंग भरला होता. मिरवणुकीच्या अग्रभागी विविध खेळ सुरू होते. अशातच मिरवणुकीवर चपला आणि दगडांचा वर्षाव सुरू झाला. रंग भरलेल्या मिरवणुकीत अचानक होऊ लागलेल्या दगडफेकीमुळे वातावरण पेटले. दुकाने पटापट बंद झाली. जमाव चिडला. वातावरण चिघळले. दोन जमाव समोरासमोर आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न  निर्माण झाला. प्रचंड तणावाचे वातावरण होते. बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या पोलिस अधीक्षक विद्या कुलकर्णी यांनी तातडीने निर्णय घेत परिस्थितीवर ताबा मिळविला. संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय गणपती मिरवणूक काढणार नाही, असा इशारा दिला होता. प्रसंगावर मात करीत सर्वांची समजूत घालत त्यांनी पुन्हा मिरवणूक सुरळीत केली. पोलिस खात्यातील अशा एकच नाही तर अनेक प्रसंगांना तोंड देत ज्यांनी महाराष्ट्राची मान तामिळनाडूत उंचावर नेली त्यांच्या कार्याचे कौतुकच केले पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मूळच्या सोलापूर Solapur येथील विद्या कुलकर्णी Vidya Kulkarni यांनी तामिळनाडूसारख्या Tamilnadu राज्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच अनेक क्लिास्ट गुन्हे उघडकीस आणले. सामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ठेवल्याने जनमानसात त्यांची प्रतिमा केवळ उजळूनच निघाली नाही तर महाराष्ट्राची शान वाढली. विद्या कुलकर्णी यांनी तहसीलदारपदाची नोकरी सोडून पोलिस खात्यात काम केले. 20 वर्षांच्या त्यांच्या कार्याची पावतीही त्यांना मिळाली. शासनाने राष्ट्रपती पदकाने त्यांचा सन्मान केला. पोलिस उपअधीक्षक, पोलिस अधीक्षक, उपायुक्त अशा विविध पदावर काम केले. सध्या चेन्नईत मुख्यालयात परीक्षा नियंत्रक आणि सचिव भरती प्रक्रियापदावर (विशेष पोलिस महानिरीक्षक) कार्यरत आहेत. कर्तव्यतत्पर, कठोर प्रशासक, कार्यतत्परता या त्रिसूत्रीमुळे खात्यात त्यांचा नावलौकीक आहे. "टाईम मॅनेजमेंट'मध्ये त्यांचा हातखंडा असल्याने नियोजनबद्ध कामावर त्यांचा भर आहे.

Image may contain: 1 person, close-up

आणखी वाचा - ठाण्यातील सिग्नल शाळेची 'रोबोटिक' भरारी

विद्या कुलकर्णी यांचे शिक्षण पंढरपूर, सोलापूर, पुणे व सांगली येथे झाले. त्या संगणक विषयात अभियांत्रिकी पदवीधर आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तहसीलदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. पण केंद्रीय सेवेकडे ओढा असल्याने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) दिली. "आयपीएस' केडरमध्ये त्यांची निवड झाली. "जनसेवा मे पहिला कदम' या उक्तीप्रमाणे त्यांनी पोलिस खात्यात लोकाभिमुख कार्य केले. दिंडीगुल (मदुराई), कुंभकोणम, श्रीविल्लीपुट्टूर, पुदूकोट्टाई, कोईंबतूर, निलगीरी (उटी), नामकल व सालेम येथे विविध पदावर काम केले. महाराष्ट्रापेक्षा तामिळनाडूत भाषा, संस्कृती, राहणीमान, सामाजिक रचना सारं काही वेगळे असतानाही सौ. कुलकर्णी यांनी त्या आत्मसात करीत तेथे एकरुप झाल्या. भिन्न वातावरणात असतानाही सेवा क्षेत्राशी बांधिलकी जपत आपली सेवा बजावत आहेत.
मध्यंतरी काही काळ पुण्यात सीबीआयच्या गुन्हे अन्वेषण विभागात सेवा बजावताना त्यांनी रेल्वेच्या शिपायापासून संरक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. महिला अधिकारी कुठेही कमी नसल्याचे त्यांनी सप्रमाण दाखवू दिले. बनावट कागदपत्राद्वारे संरक्षण खात्याची 69 एकर जागा बळकावण्याचा प्रकार उघडकीस आणून संबंधितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याच काळात एक कोटी नऊ लाखांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण त्यांनी यशस्वीरित्या उघडकीस आणले. 

आणखी वाचा - तिने कोर्टात जाऊन वकिलालाच केली मारहाण 

पद, शाखा, ठिकाण याची मर्यादा नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. कर्तव्य कठोरता आणि मनोनिश्चीयाच्या बळावर त्यांनी पोलिस विभागात काम करून आपली सिद्धता स्पष्ट केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून भरती प्रक्रिया विभागातीलसेवेपर्यंत त्यांनी ठसा उमटविणारे काम केले. दिल्लीतील सीबीआय, विशेष पथकामध्ये तसेच तामिळनाडूतील क्राईम ब्रॅंच, पोलिस मुख्यालयातही सेवा बजावताना आपल्या वेगळ्या शैलीतील कामाची चुणूक दाखविली.

आणखी वाचा- कोरोनाचा फैलाव थांबेना; आणखी 300 जणांना लागण

पुदूकोट्टाई जिल्ह्यातील ज्येष्ठ दाम्पत्याच्या खून प्रकरणाच्या उलगडण्याबरोबरच लूटमार केलेले सोनेही परत मिळविण्यात त्यांना यश आले. यासाठी त्यांनी पोर्टब्लेअर, अंदमान-निकोबार गाठून तेथील आरोपींना तामिळनाडूत आणण्याची कामगिरी केली. कोईम्बतूर येथे उपायुक्त असताना वाहतूक नियंत्रणासाठी त्यांनी नवा मसुदा तयार करून तो राबविला. एका दरोड्यात त्यांनी महाराष्ट्रातील आरोपीला अटक केली. गुजरात पोलिसांच्या मदतीने "सायबर टेक्नॉ लॉजी'चा वापर करून त्यांनी मोबाईल यंत्रणेवरून दरोड्याचा लावलेला तपास तामिळनाडू राज्यात गाजला. कर्नाटक, केरळ, गुजरात, तामिळनाडू येथील गुन्हेगारांचा छडा लावत सोने हस्तगत करण्यात त्यांना यश आले. सालेमला असताना दरोडेखोरांनी लूटलेल्या 41 किलो सोन्याच्या दरोड्याचा तपास करताना त्यांची कसोटी लागली होती. पण, ती त्यांनी लिलया पार पाडली.

पोलिस खात्यात कर्तव्य कठोर पण कुटुंबात मनमिळावू अशा दुहेरी व्यक्तिमत्वामुळे मला विद्याचा सार्थ अभिमान आहे. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती सतत कार्यमग्न असते. तिच्याबद्दल आदरच वाटतो.
- जयंत शशिकांत कुलकर्णी (चिकनगावकर), विद्या कुलकर्णी यांचे पती
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay diwanji writes about police officer vidya kulkarni tamil nadu information marathi