Abhinandan My Hero : तुम्ही माझ्या भावासारखे आहात, विंग कमांडर अभिनंदन!

abhinandan
abhinandan

देशासाठी लढणार्‍या आणि क्षणोक्षणी प्राण पणाला लावून आपलं संरक्षण करणार्‍यांचं नावही आपल्याला ठाऊक नसतं.. कधीच माहीत नसतं.. अभिनंदन वर्धमान हे नावही असंच! आज दुपारपर्यंत कुणालाही हे नाव माहीत नव्हतं  आणि आता देशातल्या प्रत्येक घरात आज अभिनंदन यांच्यासाठी प्रार्थना सुरू झाली आहे..

अभिनंदन यांना पुन्हा सुखरूप भारतात आणण्यासाठी राजनैतिक पातळीवरून सर्व ते प्रयत्न केले जातीलच.. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना नक्कीच करू शकतो.. 

सोशल मीडियावर भारतीयांनी अभिनंदन यांच्या पाठिशी सर्व देश उभा आहे, असे सांगत अभिनंदन यांना परत आणण्याची मागणी केली आहे.

अवघ्या काही दिवसांपर्यंत कदाचित त्यांच्या आयुष्यात सगळं काही नॉर्मल सुरू असेल.. पुलवामा हल्ल्यानंतर सगळंच चित्र बदललं असेल.. काल आपण बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरणार, हे तर नक्कीच होतं.. त्यामुळे आपलं हवाई दलही सज्ज असणारच..

त्यातच आज सकाळी पाकिस्तानची विमानं आपल्या हद्दीत घुसली.. आपण सज्जच होतो आणि अभिनंदन यांनी साथीदारांसह तो पाकिस्तानी हल्ला रोखण्यासाठी झेप घेतली.. त्यांच्या पराक्रमासमोर पाकिस्तानी विमानांनी पळ काढला.. पाठलाग करण्याच्या प्रयत्नांत अभिनंदन यांच्या विमानावरही पाकिस्तानने हल्ला केला. त्यात त्यांचे विमान कोसळलं.. अभिनंदन पकडले गेले..! 

आपसूक ताब्यात आलेल्या भारताच्या वैमानिकाला पाकिस्तानने जनावरासारखी वागणूक दिली, हे आपण व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पाहतच आहोत.. त्या क्रूर माणसांच्या तावडीत सापडलेल्या अभिनंदन यांचा किती छळ होईल, याची आपण सर्वसामान्य माणसं कल्पनाही करू शकत नाही..

अभिनंदन सर, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.. तुम्हाला सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करूच..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com