अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन 51चा होणार विशेष सन्मान!

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्क्वाड्रन 51चा विशेष सन्मान होणार आहे.

नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्क्वाड्रन 51चा विशेष सन्मान होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहिद झाले होते. त्यानंतर 13 दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. एअल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानाने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाडले होते. ही कामगिरी पार पाडत असताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. पाकने त्यांना दोन दिवस ताब्यात ठेवले होते. त्यानंतर पाकने त्यांची सुटका केली.

दरम्यान,  एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया यांच्याकडून अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. त्याच बरोबर स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. अग्रवाल यांनी बालाकोट येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमीका पार पाडली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhinandan Varthaman 51 Squadron to be awarded unit citation