अभिनंदन यांच्या तोंडून वदविण्याचा पाकिस्तानचा डाव फसला!

अभिनंदन यांच्या तोंडून वदविण्याचा पाकिस्तानचा डाव फसला!

नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेच्या प्रकरणातूनही भारतावर आणि भारतीय प्रसिद्धी माध्यमांवर सूड उगवण्याचा प्रयत्न पाकिस्तानवरच उलटला आहे. भारतात परत पाठविण्यापूर्वी वर्धमान यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पाकिस्तानने डावपेच टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्हिडिओमध्ये वर्धमान यांचे वक्तव्य मोडतोड करून दाखविण्यात आल्याचे उघड झाले.

वर्धमान यांना आज पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले. पण ते पाकिस्तानमध्ये असताना त्यांच्या सैन्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. 'भारतीय मीडिया मीठमसाला लावून बातम्या सांगते', असे वाक्य त्या व्हिडिओमध्ये अभिनंदन वर्धमान यांच्या तोंडी होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

पाकिस्तानमधील सोशल मीडिया युझर्सने अल्पावधीतच हा व्हिडिओ व्हायरल केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनंदन म्हणाले, की ''मी भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचा वैमानिक आहे. तुमच्या वायूदलाने आमचे विमान पाडले. तेव्हा मी पॅराशूटच्या साहाय्याने येथे आलो. येथील लोक माझ्यामागे आले होते. माझ्याकडे बंदूकही होती. मी पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाकिस्तानच्या जवानांनी मला जमावापासून वाचवले. तेथे माझ्यावर प्रथोमोपचार करण्यात आले. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी चौकशी झाली. मात्र, भारतीय मीडिया छोटी गोष्ट मोठा मिर्चमसाला लावून सांगत आहे.'

मात्र, ८३ सेकंदाच्याा व्हिडिओमध्ये तब्बल १९ कट होते. याचाच अर्थ, वर्धमान यांच्या मूळ वक्तव्यापासून भरकटविणारा अर्थ सांगणारा व्हिडिओ पाकिस्तानने अजेंडा म्हणून प्रसिद्ध केला. ट्विटरवरील अनेक युझर्सने पाकिस्तानचा हा खटाटोप उघड केला. 

विशेष म्हणजे, या कृतीमुळे जीनिव्हा कराराचेही उल्लंघन झाले होते. ही बाब लक्षात येताच पाकिस्तान माहिती प्रसारण खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ काढून टाकला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com