देशभरात 'अभिनंदन' स्टाइल मिश्यांची धूम

Abhinandan Varthamans Gunslinger Moustache Is All The Rage In India
Abhinandan Varthamans Gunslinger Moustache Is All The Rage In India

नवी दिल्ली: पाकिस्तानचे विमान पाडल्यानंतर त्यांच्या तावडीत सापडल्यानंतर पाकला मोठ्या धिटाने सामोरे जाऊन भारतात परतेलेल भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हिरो ठरले आहेत. देशवासीयांनी अभिनंदन यांना डोक्यावर घेतले असून, त्यांच्यासारखी मिशी, दाढी ठेवण्याची धूम देशभरात पहायला मिळत आहे.

अभिनंदन यांचे कर्तुत्व तरुणाईने व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात परतल्यानंतर अभिनंदन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटिझन्सच्या प्रतिक्रियांमुळे ते ट्वीटरवर ट्रेण्डमध्ये आले. एखाद्या वाघाप्रमाणे कामगिरी करून ते वाघा सीमावरून भारतात आले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मिशीची छबी मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे.

देशभरात गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याप्रमाणे मिशी कोरण्याचा उत्साह युवकांमध्ये वाढला आहे. विविध ठिकाणी केस कर्तनालयाच्या बाहेर अभिनंदन यांच्या मिशी सारखे चित्र लावलेले दिसत आहे. अभिनंदन यांच्या धाडसाबरोबरच त्यांच्या मिशीचेही कौतुक होत आहे. अनेक युवक अभिनंदन यांच्याप्रमाणे मिशा कोरून घेत असून, सोशल मीडियावर आपले छायाचित्र व्हायरल करताना दिसतात.

अभिनंदन हे माझे हिरो असून, त्यांना मी फॉलो करत आहे. अभिनंदन सरांप्रमाणेच मी माशी मिशी कोरली आहे, असे समीन खान यांनी म्हटले आहे. अभिनंदन यांच्या प्रमाणे मिशी कोरण्यासाठी काही दुकानदार सवलत देत आहेत. यामुळे अशा प्रकारची मिशी कोरण्याचे प्रमाण देशभरात वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com