केजरीवाल, दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवा: भाजप

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळाल्यास सर्व नागरिकांचा रहिवासी मालमत्ता कर (रेसिडेंन्शीअल प्रॉपर्टी टॅक्‍स) रद्द करण्यात येईल, असे आश्‍वासन केजरीवाल यांनी दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेत्या शायना इलमी म्हणाल्या, "निवडणुकांपूर्वी केजरीवाल निरूपयोगी गोष्टी दाखवितात. मात्र असे असले तरीही लोक मूर्ख नाहीत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी लोकांना मूर्ख बनविणे थांबवावे. लोक मूर्ख आणि अज्ञानी नाहीत. कृपा करून त्यांच्याशी खेळू नका.' त्या पुढे असेही म्हणाल्या की, "जो विषय त्यांच्या अखत्यारित येत नाही त्यात ते सुधारणा कसे करू शकतील, मला वाटते ते जाणूनबुजून लोकांची फसवणूक करत आहेत.'

शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, "सर्व घरांचा मालमत्ता कर रद्द करण्यात येईल. याबरोबरच मागील थकबाकीही माफ करण्यात येईल. एक वर्षात दिल्ली महानगरपालिकेला तोट्यातून फायद्यात आणू. दिल्लीतील घरे आणि नागरिकांची गणना करूनच आम्ही जबाबदारीने ही घोषणा करत आहोत.' यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांवेळी वीजेचे दर निम्मे करण्याचे आश्‍वासन दिले होते. सरकार स्थापन होताच ते पूर्ण करण्यात आले, असेही सांगितले.

Web Title: About time Kejriwal stops fooling Delhi's publis : BJP