अबू सालेमला 7 वर्षांची सक्तमजुरी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

दिल्लीस्थित व्यावसायिकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याला येथील एका न्यायालयाने आज सात वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. 2002मध्ये त्याने ही खंडणी मागितली होती. 
 

नवी दिल्ली -  दिल्लीस्थित व्यावसायिकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याला येथील एका न्यायालयाने आज सात वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. 2002 मध्ये त्याने ही खंडणी मागितली होती. 

सालेमला 26 मे रोजी या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानंतर आज दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश तरुण सेहरावत यांनी हा निकाल दिला. सालेम हा कठोर गुन्हेगार असून, ही शिक्षा त्याच्यासाठी आणि इतरांसाठी एक धडा असल्याचे त्यांनी नमूद केले. सालेमने दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जिवे मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 

Web Title: Abu Salem sent to jail for 7 years by Delhi court for extortion