कुख्यात गुंड अबू सालेमला लागले लग्नाचे वेध

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

नवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला लग्न करायचे असून, त्यासाठी सुट्टी मिळावी असे अर्जात म्हटले आहे. कौसर बहार या त्याच्या नव्या प्रेयसीशी तो लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कौसर बहार आणि अबू सालेम यांचा निकाह 5 मे रोजी ठरला आल्याचेही समजते. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मोनिका बेदीसोबतचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यावर आता अबू सालेमच्या आयुष्यात कौसर बहार नावाची 27 वर्षांची तरुणी आली आहे. 

मोनिका बेदीबरोबरचे सालेमचे संबंध चर्चेत होते. ''मी अबू सालेमचा आवाज ऐकूनच त्याच्या प्रेमात पडले'', असे मोनिका बेदीने म्हटले होते. तसेच मोनिका बेदीला चित्रपट मिळवून देण्यातही अबू सालेमचा मोठा हात होता. अटक झाल्यानंतर आपण अबू सालेमला कधीही भेटलो नाही असे मोनिकाने सांगितले.

मुंबईतील 93च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत. 1993च्या स्फोटाच्या प्रकरणात सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Abu Salem, serving life sentence for Mumbai blasts, wants parole to get married again