दिल्ली विद्यापीठावर 'अभाविप'चा झेंडा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली असून विद्यापीठातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव या चारही महत्त्वाच्या पदांवर याच संघटनेचे उमेदवार निवडून आले आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली असून विद्यापीठातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव या चारही महत्त्वाच्या पदांवर याच संघटनेचे उमेदवार निवडून आले आहेत.

काँग्रेसप्रणीत "एनएसयूआय'ला सचिवपद मिळाले आहे. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये "अभाविप'च्या अक्षित दहिया यांनी बाजी मारली असून, उपाध्यक्षपदी प्रदीप तंवर आणि संयुक्त सचिवपदी शिवांगी खरवाल हे निवडून आले आहेत. सचिवपदी "एनएसयूआय'चे आशिष लांबा यांची निवड झाली आहे.

पाकमधील आमदारच म्हणतोय, ‘इथे मुस्लिमही सुरक्षित नाहीत, मोदीसाहेब लक्ष द्या

अक्षित दहिया हे 19 हजार मतांनी विजयी झाले, तर प्रदीप तंवर यांनी 8 हजार 574 मतांनी विजय मिळविला, शिवांगी खरवाल या तीन हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. "एनएसयूआय'चे आशिष लांबा हे 1 हजार 53 मतांनी विजयी झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ABVPs Akshit Dahiya defeats NSUIs Chetna Tyagi for president post by 19000 votes